Monday, May 6, 2024
Homeक्राईम न्यूजआरोपीच्या ताब्यातून सव्वा सात लाखांचे दागिने जप्तः आर्थिक अडचणीमुळे आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याच्या...

आरोपीच्या ताब्यातून सव्वा सात लाखांचे दागिने जप्तः आर्थिक अडचणीमुळे आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याच्या घरात तरुणाची चोरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आर्थिक अडचण आणि आईच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एका तरुणने शेजारी राहणाऱ्या चे कुलूप बंद घर फोडून दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.

दिपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा करण्यात आला होता. आरोपी दीपक पाटोळे हा बेरोजगार आहे. तो आणि त्याची आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याची आर्थिक चणचण सुरू होती. आई आजारी असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दीपकने शेजाऱ्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड चोरली होती. शेजारी मूळगावी सोलापूरला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता.

बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. गेले सहा महिने गुन्ह्याचा छडा लागला नव्हता. अखेर तपासात मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने घरफोडीची कबुली दिली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण काळुखे, संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी ही कामगिरी केली.

असा लागला गुन्ह्याचा छडा

आरोपी दीपक पाटोळेने आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्यांच्या घरातून सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज चोरला. ऐवज चोरल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून त्याने स्वतःसाठी नवीन मोबाइल संच खरेदीकेला. घरात नवीन दूरचित्रवाणी संच खरेदी केला. दीपकच्या राहणीमानात बदल झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावरचा संशय बळावला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने घरफोडीची कबुली दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments