Monday, May 6, 2024
Homeक्राईम न्यूजवडिलांकडून मुलाच्या खूनाची 75 लाखांची सुपारीः कौटुंबिक कलह आणि मालमत्तेचा होता...

वडिलांकडून मुलाच्या खूनाची 75 लाखांची सुपारीः कौटुंबिक कलह आणि मालमत्तेचा होता वाद; सहा आरोपी पोलिसांकडून अटकेत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कौटुंबिक कलह आणि मालमत्तेच्या वादातून बापानेच आपल्या पोटच्या मुलाची ७५ लाखांत खूनाची सुपारी दिली. जंगली महाराज रस्त्यावर भरदुपारी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करून खून प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सुदैवाने पिस्तूलातून गोळी झाडली न गेल्यामुळे बांधकाम व्यवसायिकाचा जीव वाचला होता. दरम्यान या प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने लावला असून, त्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी वडील दिनेशचंद्र ऊर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे पाटील (वय ६४, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पर्या तुकाराम कुडले (वय ३१, सुतारदरा), योगेश दामोदर जाधव (वय ३९) व चेतन अरुण पोकळे (वय २७) यांना अटक केली आहे. याबाबत धीरज दिनेशचंद्र अरडगे (वय.-३८, रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

जंगली महाराज रस्त्यावर अरगडे हाईट्स या इमारतीच्या खाली भरदुपारी १६ एप्रिल रोजी बांधकाम व्यवसायिक धीरज अरगडे यांच्यावर दुचाकीवर स्विगीचे टीशर्ट व हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या दोघांनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने पिस्तुल कॉक न झाल्याने गोळी झाडली गेली नाही, म्हणून धीरज यांचे प्राण वाचले. दरम्यान सलग गोळीबाराच्या घटना घडत असल्याने शहरात एक दहशतीचे वातावरण देखील तयार झाले होते. या गुन्ह्याचा तपास तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यावेळी युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती घेतली. त्यानुसार गुन्ह्याचा छडा लागला आहे. प्रत्यक्ष गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांच्या चौकशीत वडिलांची माहिती समोर आली. धीरज मारण्यासाठी जानेवारी महिन्यापासून प्लॅनिंग करण्यात येत होते. दरम्यान धीरजला मारण्यासाठी पंधरा दिवसापासून पाळत ठेवण्यात आली होती.

धीरज अरडगे वर १० मार्च रोजी सुस रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये चाकु हल्ला झाला होता. हा हल्ला प्रवीण कुडले आणि चेतन पोकळे यांनी केला होता. त्याच दिवशी तक्रारदार यांचा खुनच करायचा होता. त्यानुसार हल्ला केला होता. पण, सुदैवाने ते यातून बचावले. दरम्यान कुडले आणि पोकळे या दोघांनी दिनेशचंद्र आणि प्रशांत या दोघांना धिरज हल्ल्यात मेला असे सांगून २० लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्ष पाहिले असता, दोघांना धिरज जिवंत असल्याचे दिसून आले. त्यानंतर कुडले आणि पोकळे यांच्यासोबत दोघांचा वाद झाला होता. यानंतर ऑफिस मधील दोघांना धीरजची सुपारी देण्यात आली होती. त्यांनी १ लाख घेऊन पळ काढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments