Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड ! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात...

पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड ! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात १३ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या साठी गैरप्रकार टाळण्यासाठी पुण्यात पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून गुन्हेगारांची ओळख परेड घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली. गुरुवारी तब्बल हजार हून अधिक गुंडांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना तंबी देण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार गुंडांच्या परेड काढण्यात येत आहे. या पूर्वी अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पुण्यातील अट्टल गुन्हेगारांची शाळा पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात भरवण्यात आली होती.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहे. पुण्यात १३ तारखेला मतदान पार पडणार आहे. हे मतदान शांततेत आणि निर्विघ्न पार पडण्याची जबाबदारी पोलीसांवर आहे. यामुळे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी चेक नाके देखील उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पोलिस नजर ठेवून आहेत. दरम्यान, निवडणुकीपूर्वी पोलिसांनी पुन्हा एकदा शहरातील गुंडांची झाडझाडती घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार पुण्यातील विविध पोलीस ठाण्यातील गुंडांची हजेरी घेण्यात आली असून त्यांना गैरप्रकार तसेच निवडणूक काळात घातपात केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गुन्हेगारीच्या घटना वाढल्या

पुणे जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात कोयता गँग आणि गाडी तोडफोडीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. त्यात अल्पवयीन गुन्हेगारांपासून ते ते अट्टल गुन्हेगारांच्या टोळ्यांचाही समावेश यश या गुंडांची ओळख परेड पुणे पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच त्यांना तंबी देखील दिली जात आहे.

१०९ पोलिस ठाण्यात गुन्हेगारांची ओळख परेड

पुणे आयुक्तालयाच्या अंतर्गत एकूण १०९ पोलीस ठाणी येतात. या पोलिस ठाण्याच्या सर्व पोलिस निरीक्षकांना त्यांच्या परिसरातील गुंडांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांना गैर प्रकार न करण्यासंदर्भात समज दिली जात आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून पुण्यातील प्रत्येक पोलीस चोकीत, ठाण्यात गुन्हेगारांची ओळख परेड घेण्यात आली. यात १००० हून अधिक गुन्हेगारांना बोलवून त्यांना तंबी देण्यात आली. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, कोयता हल्ल्यातील गुन्हेगार, गाड्यांची तोडफोड करणारे गुन्हेगार यांचा समावेश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments