Tuesday, May 7, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात मुळशी पॅटर्न नाही तर कायद्याचा पॅटर्न चालणारः पोलिस आयुक्त अमितेश कुमार...

पुण्यात मुळशी पॅटर्न नाही तर कायद्याचा पॅटर्न चालणारः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा गुंडांना इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मागच्या काही दिवसात सलग गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर काही जणांनी पुण्यात मुळशी पॅटर्नकॅची आठवण काढली. याबाबद्दल बोलतांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुण्यात मुळशी पॅटर्न नाही तर फक्त कायद्याचा पॅटर्न चालणार, असे म्हणत त्यांनी गुंडांना इशारा दिला आहे.

गुन्हे शाखे आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबवून बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या २८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ९५ हजारा १०० रुपयांचे ४२ अग्निशस्त्र आणि ७४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

तसेच यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आर्म ऍक्ट आणि शस्त्रचा वापर स्ट्रीट क्राईम मध्ये करण्यात येत आहे. हे थांबविणे पोलिसांची प्राथमिकता आहे. यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील, खुनाच्या प्रयत्नातील, एमपीडीए, तडीपार, आर्म ऍक्ट, मोक्का सारख्या गुन्ह्यातील आरोपी जामिनावर बाहेर आले असतील. या सगळ्या आरोपी विरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरात कायद्या सुवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून गुन्ह्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवत आहेत. गुन्हेगारांवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. सामान्य नागरिकांना गुन्हेगार त्रास देत असेल तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. तसेच यापुढील काळात देखील अवैध धंद्यावर कारवाई सुरु राहणार असल्याची त्यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments