Friday, May 10, 2024
Homeक्राईम न्यूज12 वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद: कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात...

12 वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद: कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात आरोपी, नाव बदलून गुजरातमध्ये वास्तव्यास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पत्नीला मारहाण करून कौटुंबिक हिंसाचार केल्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मागील 12 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधील बारडोलीतून जेरबंद केले आहे. आरोपी मागील बारा वर्षांपासून स्वतःचे नाव बदलून गुजरातमध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे.

रहिम उर्फ वहिम अब्बास पटेल (वय ४५, रा. बारडोली जि. सुरत, गुजरात. मुळ रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या संबधित आरोपीचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यतील फरार आरोपी वहीम पटेल याला पुणे न्यायालयाने वॉरंट बजावले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा न लागल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे आणि पथकाने वानवडी परिसरात त्याचा कसून शोध घेतला.

त्याचे नातेवाईक, मित्रांकडे सविस्तर चौकशी करण्यात आली. मात्र, पोलसांना आरोपी बाबत पुरेशी माहिती मिळाली नाही. आरोपी वहिम पटेल हा नाव बदलून गुजरातमधील बारडोली परिसरात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाली. त्यानुसार पथकाने १३ वर्षांपूर्वीचे पटेलचे छायाचित्र मिळवले. पोलिसांच्या पथकाने बारडोली परिसरात त्याचा विविध जागी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो १२ वर्षापासून पोलिसांच्या अटकेला घाबरून स्वतःचे नाव बदलून वास्तव्य करत असल्याचे त्याने सांगितले. पटेलला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, रमेश साबळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, पांडुरंग कांबळे यांनी ही कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments