Friday, May 10, 2024
Homeक्राईम न्यूजसायबर चोरट्याकडून 1 कोटींची फसवणूकः पुणे शहरातील पाच जणांना लावला गंडा,...

सायबर चोरट्याकडून 1 कोटींची फसवणूकः पुणे शहरातील पाच जणांना लावला गंडा, मनी लाँड्रिंगची केस असल्याचे सांगत लूटले पैसे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सायबर चोरटे नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत आहेत. तर कधी पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करत आहे. गुरुवार शहरातील विविध पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून चोरटयांनी ५ जणांची तब्बल १ कोटी ६ लाख ६ हजार ८८८ रुपयांची फसवणूक केली आहे.

सायबर चोरटयांनी शिवाजीनगर येथील एकाला संपर्क करून मनी लाँड्रिंगची केस असल्याचे सांगून पैसे पाठवायला सांगून ४९ लाख ३७ हजारांची फसवणूक केली आहे. तर धानोरी येथील एकाला तुमच्या नावाने पार्सल आले असून त्यात अंमली पदार्थ असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी पैसे पाठवायला सांगून ३४ लाख ८० हजारांची फसवणूक केली आहे. याचबरोबर सायबर चोरटयांनी धायरी येथील एकाला प्रीपेड टास्कच्या आमिषाने ११ लाख २१ हजारांची फसवणूक केली आहे. इतर दोघांची सुद्धा याच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे.

फेडेक्स, मुंबई पोलीस, सीबीआय अन् ४९ लाख ३७ हजारांचा गंडा

फेडेक्स कुरिअर, मुंबई क्राईम ब्रँच सीबीआआयच्या फंड्याने सायबर चोरट्याने शिवाजीनगर येथील एकाची ४९ लाख ३७ हजार ९४४ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मिचलीन कंपनीत काम करणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयटी ऍक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांना २१ एप्रिल रोजी मुंबई कस्टम मधून बोलत असल्याचे सांगून मुंबई ते थायलंड जाणाऱ्या फेडेक्स पार्सल मध्ये पाच पासपोर्ट, ३ क्रेडीट कार्ड आणि १४० ग्रॅम ड्रग्ज, ४ किलो कपडे, १ लॅपटॉप सापडले आहे. यानंतर फिर्यादी यांना स्काईप आयडीवरून संपर्क करून मुंबई क्राईम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगितले. यानंतर आधारकार्ड नंबर सांगून हा नंबर मनी लाँड्रिंग साठी वापरत आला आहे. यानंतर सायबर चोरट्याने हे प्रकरण गंभीर असून याचा तपास सीबीआयचे अधिकारी करतील अशी भीती फिर्यादी यांना दाखवून पुढच्या काळात तुम्ही कुठे कुठे फिरायला जाणार असल्याची माहिती विचारली. यानंतर बँक खात्यातील पैसे सरकारकडे पाठवून संशोधन करावे लागेल असे सांगून अवघ्या तीन दिवसात ४९ लाख ३७ हजार ९४४ रुपये विविध बँक खात्यावर पाठवायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments