Saturday, April 27, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा बहाणा; 77 लाखांची फसवणूकः वाकड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा बहाणा; 77 लाखांची फसवणूकः वाकड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सोशल मीडियावर एका अनोळखी व्यक्तीने बिझनेस ग्रुपमध्ये मोबाइल क्रमांक अॅड करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने ७७ लाख ५० हजार रुपयांची अॉनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी जिमीत मोदी, धनंजय सिंह व मिकी चोप्रा या अारोपींवर वाकड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. हा प्रकार ७ डिसेंबर २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने तक्रारदारास १३३ वेल्स फॉर्च्यून बिझनेस स्कूल नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्या ग्रुपचे वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकधारक अारोपी व जिमीत मोदी, धनंजय सिंह या अनोळखी व्यक्तींच्या नावाने हा ग्रुप चालवला जात होता. या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर मार्केट अॅनालिसिस जिमीत मोदी व धनंजय सिंह हे करत असत व त्यांचा सहयोगी म्हणून मिका चोप्रा हे काम पाहत होते. त्या क्लासची लिंक वेल्स लिव्ह ही होती. त्या लिंकवर शेअर मार्केटसंबंधी रिकमेंडेशन त्यांचा सहयोगी मिका चोप्रा हा करत असे. त्यांचे रिकमेंडेशनप्रमाणे तक्रारदार हे स्वतःच्या खात्यावर शेअर्स गुंतवणूक करत होते. त्यानंतर तक्रारदार यांना वेल्स स्टॉक अॅप नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास अारोपींनी सांगितले. त्यामध्ये नफा मिळेल व अायपीअो मिळण्याची जास्त संधी अाहे, असे सांगून तक्रारदार यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण ७७ लाख ५० हजार रुपये घेतले. नंतर त्यांना कोणताही परतावा न देता तसेच गुंतवणुकीची मूळ रक्कम परत न करता फसवणूक करण्यात अाली अाहे.

फ्रँचायझी देण्याचे आमिष

पुण्यातील घोरपडे पेठ येथे राहणाऱ्या योगेश लालचंद अोसवाल (४६) यांच्याशी वस्तू विक्री करण्याची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने अज्ञात अारोपीने संपर्क साधला. त्यानंतर फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने वेगवेगळी कारणे सांगून अज्ञात अारोपीने एकूण पाच लाख रुपये अारोपीच्या खात्यात भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments