Sunday, April 28, 2024
Homeक्राईम न्यूजशेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा देण्याचे आमिषः आरोपीचे धागेदोरे बँकॉकपर्यंत, 100...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा देण्याचे आमिषः आरोपीचे धागेदोरे बँकॉकपर्यंत, 100 कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा संशय

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आयबीकेआर, क्रिसेट अकॅडमी, गोल्डमन सॅच या व्हॉटसअप ग्रुपचा वापर करुन विविध गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत वाकड पोलिस ठाण्यात संबंधीत कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर असून आरोपीचे धागेदोरे बँकॉकपर्यंत पोहचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या एकूण 6 खात्यांविरोधात भारतात एकूण 177 तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या आहेत. त्याद्वारे 100 कोटींहून अधिकच्या रकमेची फसवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली आहे.

याबाबत वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्या तक्रारदारांची 10 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यानुसार, आ यबीकेआर, क्रिसेट, अकॅडमी, गोल्डमन सॅच या कंपनीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे वर्ग करण्याचे आदेश दिलेत. या गुन्ह्यात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी फसवणुकीच्या पैशांतून गुजरात येथील सराफाच्या दुकानातून सोने खरेदी करत होते. त्याची खबर सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना मिळाली. त्यानुसार मिळालेली माहिती व तक्रारदार यांनी आरोपींच्या खात्यावर भरलेल्या पैशांचे तांत्रिक विश्लेषण करून गुजरात येथून आरोपी अमित जगदीशचंद्र सोनी यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, तो सोन्याच्या व्यापाऱ्यांकडून सोने घेऊन त्याचे कॅशमध्ये रुपांतर करत होता. त्यानंतर ते अहमद नजीर गाझी याला देत होता.

अहमद नजीर गाझी हा ही रोख रक्कम मुफ्दल व त्याचा भाऊ आबिद याला यूएसडीटीमध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी पाठवत असे. आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ अबादी व मुफ्दल हा बँकॉकमध्ये राहून तेथील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीने आतापर्यंत 6 खात्यांमधील पैसे काढून बँकॉकला पाठवल्याचे दिसून येत आहे. त्या दृष्टिकोनातून आरोपीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments