Thursday, May 2, 2024
Homeक्राईम न्यूज'शरद पवारांना संपविणं एवढं सोपं नाही'; सुप्रिया सुळेंचा कोणावर वार ?

‘शरद पवारांना संपविणं एवढं सोपं नाही’; सुप्रिया सुळेंचा कोणावर वार ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वेल्हे : “आम्ही नुसते जय श्रीराम म्हणत नाही, तर आम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणतो. आम्ही मर्यादा राखूनच सुसंस्कृत राजकारण व समाजकारण करतो. आमची लढाई वैचारिक असून, लोकशाहीमध्ये विरोधक असला पाहिजे, नसेल तर ती दडपशाही मानली जाते आणि ही दडपशाहीची भाषा भाजपच्या माध्यमातून केली जात असून, बारामतीमध्ये येऊन शरद पवार (Sharad Pawar) यांना संपवण्याची भाषा केली जाते, ही भाषा कोणत्याही सुसंस्कृत पक्षाला शोभत नाही, परंतु शरद पवार संपवणे एवढे सोपे नाही. अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केली.

किल्ले राजगडाच्या (Fort Rajgad) पायथ्याशी असलेल्या साखर येथे प्रचारानिमित्त आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या. त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “माझ्या मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यामधील काही माणसे माझ्याविरुद्ध प्रचारासाठी फिरत आहेत. विरोधकांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने भाडोत्री माणसांकडून प्रचार करण्याची वेळ आली आहे. माझा माझ्या कार्यकर्त्यांवरती पूर्ण विश्वास असून ते निष्ठेने काम करत आहेत.”

संग्राम थोपटे म्हणाले, “पवारसाहेबांचे बोट धरून अनेकांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांना राजकारणात अनेक पदे मिळाली. साहेब व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विकास निधी आणला. गावोगाव विकास झाला आणि आता तेच पंधरा वर्षांत काय विकास झाला, असा सवाल करत आहेत. विजय शिवतरे यांना एका रात्रीत काय साक्षात्कार झाला की त्यांना तलवार म्यान करावी लागली. ते पुरंदरचे पलटूराम आहेत.”

यावेळी मानसिंग धुमाळ, शंकरराव भुरुक, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, अमोल नलावडे, शोभा जाधव, संतोष रेणुसे, नाना राऊत, सीमा राऊत, संदीप नगीने, सुवर्णा राजीवडे, प्रकाश बडे, शिवराज शंकर, गणेश जागडे, शैलेंद्र वालगुडे, दीपक दामगुडे, हनुमंत कार्ले, गोरख भुरुक, रमेश शिंदे, दुर्गा चोरगे, सुधीर रेणुसे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments