Friday, May 17, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजराः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजराः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मतदान करण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तर, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अप्पर आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल, तसेच आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments