Friday, May 17, 2024
Homeक्राईम न्यूजएमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः महावितरणचा सहाय्यक अभियंता 45 हजारांची...

एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः महावितरणचा सहाय्यक अभियंता 45 हजारांची लाच घेताना एसीबीकडून जेरबंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोसरी येथील एका कंपनीचा विद्युतभार वाढवण्यासाठी तब्बल 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने सापळा रचून 50 हजारांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 45 हजार रुपये घेत असताना, सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी किरण राजेंद्र मोरे (वय-33, राहणार – भोसरी, पुणे) या अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसीबीकडे आरोपी विरोधात 47 वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

यातील तक्रारदार हे फ्रेंड इलेक्ट्रानिक्स कंपनी, पुणे चे सर्व कामकाज पाहतात. नमुद कंपनीला सन राईस कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. सदरचा विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सह्यक अभियंता किरण मोरे यांचेकडे आला होता. किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे सदरचे काम करुन देण्यासाठी ५० हजार रुपये लालचे मागणी केली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता, किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष विद्युत भार वाढविण्यासाठी तडजोडीअंती ४५ हजार रुपयाची लाच रक्कमेची मागणी करुन, किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये ४५ हजार लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या पथकाने केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments