Sunday, April 28, 2024
Homeक्राईम न्यूजमहायुतीच्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी वस्ताद व कुस्तीगीरानी सहकार्य करावे- उपमुख्यमंत्री...

महायुतीच्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी वस्ताद व कुस्तीगीरानी सहकार्य करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वारजे : मी स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला येथे आलो नाही. तर महायुतीच्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी वस्ताद व कुस्तीगीरानी सहकार्य करावे. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्वेनगर येथे केले.

कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील नामांकित वस्ताद व कुस्तीगिरांचा स्नेह मेळावा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले खेळामध्ये कोणतेही राजकारण आणता कामा नये. पूर्वी खेळामध्ये राजकारण झाल्यानेच अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करू. कोल्हापूर मध्ये अनेक पैलवान निर्माण होतात. त्यासाठी कोल्हापूरच्या तालमीसाठी भविष्यात विकास आराखडा तयार करण्यात येईल. तसेच क्रीडा क्षेत्रामधील मिळणाऱ्या पदकामध्ये राज्य सरकारने जवळपास दहा पट वाढ केलेली आहे.

त्यामुळे हे सरकार क्रीडा क्षेत्रामधील खेळाडूंसाठी व कुस्तगीरांसाठी चांगले काम करत आहे. भविष्यातही असे काम केले जाणार आहे. पुण्यामधून कुस्तीगीर क्षेत्रातीलच व्यक्ती संसदेत गेला पाहिजे यासाठी कुस्तीगिरांनी मदत करणे गरजेचे आहे.

त्यासाठी तुम्हाला भावनिक फोन येतील मात्र भावनिक होऊन चालणार नाही. पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे व क्रीडापटूंसाठी आपण बालेवाडी येथे ऑलिंपिक भवन उभारत आहोत. अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

देशाचे पंतप्रधान मोदी ही क्रीडा विभागाकडे स्वतःहून लक्ष देत आहे. त्यामुळे पुढील काळात क्रीडा विभागाची भरभराट होईल. तसेच पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहेत. तशीच सार्वजनिक वाहतूक सुधारण्यावरती ही भर देण्यात येईल. गुरुवारी तिथीनुसार संपूर्ण राज्यात शिवजयंती होत आहे.

त्या कार्यक्रमाचेही आयोजनहि संपूर्ण राज्यात करण्यात आले आहे. अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास दीपक मानकर, आप्पा रेणुसे, बाबा कंधारे, बाबुराव चांदेरे, पंकज हरपुडे, कुमार बराटे, मंगलदास बांदल, हिंदकेसरी अमोल बराटे, योगेश दोडके, शिल्पा भोसले व नामांकित पहिलवान उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments