Saturday, April 27, 2024
Homeक्राईम न्यूजपोलिसांना बघताच ड्रग्ज तस्कराचा हृदयविकाराने मृत्यू

पोलिसांना बघताच ड्रग्ज तस्कराचा हृदयविकाराने मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – पोलिसांना घरी आल्याचे बघताच अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी नाना पेठ परिसरातील एका अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या (वय ५२) घरी छापा टाकला. पोलिसांचे पथक घरी आल्याचे बघताच तो हृदयविकाराने खाली कोसळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुणे पोलिसांनी ‘ड्रग्जमुक्त पुणे’ अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हे शाखेने पुण्यासह कुरकुंभ, दिल्ली, सांगली परिसरात छापे टाकून ड्रग्ज तस्करांविरुध्द नुकतीच मोठी कारवाई केली होती. त्यात सुमारे पावणेचार हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी आता शहरातील पब्ज, हॉटेल्स आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोर्चा वळवला आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोंढवा, हडपसर भागात छापे टाकून पाच नायजेरियनसह सात जणांना नुकतीच अटक केली. स्थानिक पोलिसांकडूनही त्यांच्या हद्दीतील अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments