Thursday, May 2, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; रात्री उशिरा शहरात मुसळधार

पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस; रात्री उशिरा शहरात मुसळधार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः दिवसभर प्रचंड उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हजेरी लावली. सलग दूसऱ्या दिवशी शहराच्या पूर्व भागासह बारामती, इंदापूर, हवेली, शिरूर, दौंड आदी तालुक्यांत वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस कोसळला. पुढील दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात उकाड्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वादळी पावसाच्या हजेरी बरोबरच जिल्ह्यातील कमाल तापमान पुन्हा वाढले आहे. अनेक ठिकाणी पारा ४१ अंशांच्या पार गेला आहे. तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक म्हणजे ४३.१ अंश सेल्सिअस तापमान होते. तर पुणे शहरातील सरासरी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

बुधवारी दुपारी अचानक आकाश ढगाळ होत संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्याच्या पूर्व भागात रात्री उशीरापर्यंत अवकाळी पावसाचे ढग दाटले होते. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानिची शक्यता आहे. बाष्पयुक्त हवा आणि वाढलेल्या तापमानामुळे गुरूवारी (ता. १८) जिल्ह्यात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ आणि अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवमान खात्याने दिली आहे. तर राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा (यलो अलर्ट) इशारा, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहरात रात्री उशिरा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शिवाजी नगरसह परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

बारामतीत २० मिलिमीटर पाऊस

संध्याकाळी बारामती तालुक्यावर ढगांनी गर्दी केली होती. त्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. लगतच्या इंदापूर, फलटन, कर्जत आदी तालुक्यांतही वादळी पाऊस कोसळला. रात्री उशीरापर्यंत पावसाची हजेरी कायम होती. रात्री साडेनऊ पर्यंत मिळालेल्या आकडेवारी नुसार बारामतीत सरासरी २०.५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

जिल्ह्यातील अवकाळी पाऊस (मिलीमीटर)

वडगाव शेरीः १६

– हवेलीः १

– बारामतीः २०.५

– पाषाणः ०.५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments