Tuesday, April 30, 2024
Homeक्राईम न्यूजUPSCच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशः एकूण 16 विद्यार्थ्यांची निवड झाली

UPSCच्या परीक्षेत बार्टीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यशः एकूण 16 विद्यार्थ्यांची निवड झाली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणी परीक्षेकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले जाते. मंगळवारी लागलेल्या संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा २०२३ परीक्षेच्या निकालात बार्टीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

या निकालात बार्टी संस्थेच्या एकूण १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये विवेक विश्वनाथ सोनवणे – (रँक 126), वृषाली संतराम कांबळे (रैंक 310), प्रियांका सुरेश मोहिते – (रँक 595), सुरेश लीलाधरराव बोरकर – (रँक 658), नम्रता दामोधर घोरपडे (रँक 675), सुमितकुमार दत्ताहरीराव धोत्रे – (रँक 750), काजल आनंदकुमार चौहान – (रँक 753), प्रांजली मनोहर खांडेकर – (रँक 761)

, प्रशांत सुरेश भोजने (रँक 849), प्रतीक दादासाहेब बनसोडे -( रैंक 862), चिन्मय गिरीश बनसोड (रँक 893)

नीलेश प्रकाशराव डाके (रँक 918), स्नेहल ज्ञानोबा वाघमारे – (रैंक 945), शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (रैंक 963), गौरव हितेश टेंभुर्णीकर – (रँक 966), सुशीलकुमार सुनील शिंदे – (रैंक 989) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना बार्टी कडून परीक्षेच्या विविध टप्प्यावर मार्गदर्शन व आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे असे बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी सांगितले.

बार्टी कडून यशदा येथे संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी अभिरूप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. अभिरूप मुलाखतीच्या पॅनल वर राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, बार्टीचे महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करता आले असे महासंचालक बार्टी पुणे यांनी सांगितले.

बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments