Wednesday, May 1, 2024
Homeक्राईम न्यूजजुन्या वाड्याला आग, ट्रॉफीचे गोदाम जळून खाकः पुण्यात भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील...

जुन्या वाड्याला आग, ट्रॉफीचे गोदाम जळून खाकः पुण्यात भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील शनिवारवाडा जवळील भाऊ रंगारी गणपती मंदिर परिसरातील एका जुन्या लाकडी वाड्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ रंगारी गणपती मंदिर परिसरातील अरूंद गल्लीत आग लागल्यानंतर परिसरात धावपळ उडाली. वाड्याजवळील कचरा पेटवून दिल्याने सदरची आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सदर भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या गल्लीत विविध खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक मजली बांधकाम असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. वाड्याच्या परिसरातील ट्रॉफी गोदाम असलेल्या दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात घबराट उडाली. अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा वेगाने मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अरुंद गल्लीत अग्निशामक बंब पोहचण्यास अडथळा आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

वेगात कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिवाजीनगर परिसरातील कामगार पुतळा परिसरात कठड्यावर आदळून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. बॉबी निरंजन चांदेकर (वय ४८, रा. शीतलानंद सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रूपाली तोरडमल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार चांदेकर ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरात निघाले होते. पुलाजवळ असलेल्या सिमेंटच्या कठड्यावर दुचाकीस्वार चांदेकर आदळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपरचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments