Sunday, April 28, 2024
Homeक्राईम न्यूज११० महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; एप्रिलअखेर...

११० महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय; एप्रिलअखेर यादी प्रसिद्ध

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एकही विद्यार्थी नसलेली आणि शुल्क न भरणाऱ्या ११० महाविद्यालयांची संलग्नता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे रद्द करण्यात येणार आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून कोणताही प्रवेश घेता येणार नाही. पालकांच्या सोयीसाठी अशा महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे.

सध्या विद्यापीठाशी ८०० हून अधिक महाविद्यालये संलग्न आहेत. त्यांना विद्यापीठाची संलग्नता मिळविण्यासाठी विविध शैक्षणिक सुविधांची पूर्तता केल्यानंतर संलग्नता शुल्क भरावे लागते. त्यानंतरच महाविद्यालयाला विद्यापीठाची संलग्नता प्राप्त होते. मात्र ११० महाविद्यालयांनी मागील वर्षापासून संलग्नता शुल्क भरलेलेच नाही. तसेच तेथील शैक्षणिक सुविधा आणि प्रवेशाबाबत संदिग्धता आहे. यामध्ये प्रामुख्याने कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे बोटावर मोजण्याइतके प्रवेश आहेत. त्यामुळे एप्रिलअखेर अशा महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यात येईल.

कालबाह्य अभ्यासक्रम

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातही विशेष करून कला शाखेत कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या एक आकडी झाली आहे. काही पदव्युत्तर महाविद्यालयांतील अनेक अभ्यासक्रम आता बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. भविष्याची गरज आणि कौशल्याभिमूखतेचा विचार करत अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. अन्यथा पारंपरिक महाविद्यालये ओस पडतील, अशी शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याचा विचार करूनच संबंधित महाविद्यालयाची संलग्नता काढून घेण्यात येईल. शंभरपेक्षा जास्त महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. विद्यार्थी प्रवेश संख्येचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments