Monday, May 6, 2024
Homeक्राईम न्यूजहोर्डिंग कोसळल्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस, कार मालकांची पोलीसात तक्रार

होर्डिंग कोसळल्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस, कार मालकांची पोलीसात तक्रार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात होर्डिंग कोसळल्या प्रकरणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने होर्डिंग मालकाकडुन नोटीसीद्वारे केवळ खुलासा मागविला आहे. तर नुकसान झालेल्या कार मालकानी पोलीसात तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसली तरी प्रशासनला मात्र गांभीर्य नाही. यापूर्वीही शहरात अशा प्रकारच्या दोन दुर्घटना घडुन बळी गेले आहेत.

बुधवारी सांयकाळी झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने साई सत्यम पार्क परिसरात पुणे नगर महामार्गावर होर्डिंग कोसळून तीन ते चार कारचे नुकसान झाले. यामुळे काही तास महामार्गावर चक्का जाम झाला होता.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. हे होर्डिंग अधिकृत होते. मात्र ते कमकुवत असल्याने कोसळले. या पाऊस व वाऱ्याने वाघोलीतअनेक ठिकाणचे अनाधिकृत प्लेक्स, कमानी, लोखंडी फलकही तुटले. यामध्येही काही वाहनांचे नुकसान झाले. होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग्स् आहे. त्यांचे त्वरीत स्ट्रक्चरल ऑडीट करावे. अशी मागणी नागरीक करीत आहेत. अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडु शकतात. सध्या जो पाऊस पडतो आहे तो अवकाळी आहे.

त्यातच अशा घटना घडत आहेत. तर पावसाळ्यात काय स्थिती निर्माण होईल. अंसा सवाल नागरिक करीत आहेत. होर्डिंग मालकाला नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. त्याचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असे नगररोड क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांनी सांगितले. तर कार चालकांची तक्रार आली आहे. त्यानुसार चौकशी करून पुढील कारवाई होईल. असे लोणीकंदचे उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी सांगितले.

क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे मागणी

पावसाळी गटार वाहिन्या त्वरीत साफ कराव्यात. तसेच सर्व होर्डीगचे त्वरीत स्ट्रक्चरल ऑडीट करावे. अनाधिकृत प्लेक्स काढून टाकावेत. अशी मागणी नगररोड क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांना भेटून केल्याची माहिती ३४ गाव विकास समिती सदस्य संदीप सातव यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments