Friday, May 3, 2024
Homeक्राईम न्यूजमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज 'या' वेळेत राहणार बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज ‘या’ वेळेत राहणार बंद; पर्यायी मार्गांचा करा वापर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (दि २३) गॅन्ट्री बसवण्याच्या कामासाठी दोन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पुणे मुंबई मार्गिकेवर दुपारी १२ ते २ दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) दिली आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (MSRDC) विविध विकास कामे सुरू आहेत. या मार्गावर केल्या काही दिवसांपासून गॅन्ट्री बसवण्याचे काम सुरू आहे. महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग म्हणून, पुणे ते मुंबई या वाहिनीवर १९.१०० किलोमीटर अंतरावर गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. हे काम आज मंगळवारी दुपारी १२ ते २ दरम्यान केले जा नर आहे. त्यामुळे या काळात या एका मार्गिकेवरील वाहतूक ही या काळात बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्लॉक काळात मुंबई वाहिनीवरून प्रवास करणा-या सर्व प्रकारच्या हलक्या आणि अवजड वाहनांना पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, सुरळीत प्रवास व्हावा यासाठी वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी मुंबई वाहिनीवर ५५ किमी किलोमीटरच्या लेनवर डायव्हर्जन पॉइंट तयार करण्यात आला आहे. येथून वाहने ही मुंबईकडे वळवण्यात आली आहेत. पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८, खोपोली पासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करून. तेथून मुंबई वाहिनीमार्गे शेडुंग टोलनाक्यावरून वाहने वळवण्यात येणार आहे.

एक्सप्रेसवे वर आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासाची विकास कामे सुरू असून प्रवाशांची गैरसोय कमी करणे हे या कामाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तात्पुरता ट्रॅफिक ब्लॉक गॅन्ट्री बसवण्यासाठी, महामार्गाची वाहतूक व्यवस्थापन व्यवस्था वाढवण्यासाठी आवश्यक आहे. ब्लॉक काळात प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी मोटार चालकांना प्रदान केलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments