Saturday, May 4, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव ! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं...

पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीत अग्नितांडव ! दुकानांना आग लागून लाखो रुपयांचं नुकसान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील रविवार पेठेतील अतिशय गजबजलेला आणि व्यापारी केंद्र असलेल्या भोरी आळीतील काही दुकांनाना आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत मोठ्या प्रमाणात दुकानातील साहित्य भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही.

रविवार पेठेतील भोरी आळीतील रामसुख चेंबर्स आणि काही दुकानांना आज पाहते ५.१० मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण ४ फायरगाड्या व २ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी एका इमारतीत तळमजल्यावर असलेल्या काही दुकानामध्ये आग लागल्याचे दिसले. तातडीने अग्निशामक दलाच्या जवानांनी कुजिम श्वसन उपकरण (बी ए सेट) परिधान करत प्रथम इमारतीत आणि दुकानामध्ये प्रवेश करत आत कुणी अडकले आहे का याची खात्री करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला.

दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात किराणा मालाचा साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असल्याने आग इतरञ पसरू नये याची दक्षता घेत जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवत मोठा धोका दुर केला. दुकानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत असल्याने अग्निशामक दलाकडून एक्झॉस्ट ब्लोअरच (धूर बाहेर काढण्याचे यंत्र) वापर करून आजुबाजूला असणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

आगीचे कारण अस्पष्ट

या दुकानाला आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत सुदैवाने जखमी अथवा मृत्यूमुखी पडले नाहीत. ही व्यावसायिक इमारत चार मजल्यांची असून या संपूर्ण इमारतीत विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. या आगीमध्ये शांती क्रॉकरी अँन्ड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचे पुर्ण नुकसान झाले असून दुकानातील सर्व माल जळाला आहे.

अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी ही आग नियंत्रणात आणली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments