Sunday, April 28, 2024
Homeक्राईम न्यूजपुण्यातील घोरपडीत कॅनाल मध्ये बुडालेल्या मुलाचा मृतदेह मिळालाः अग्निशमक दलाच्या जवानांनी मृतदेह...

पुण्यातील घोरपडीत कॅनाल मध्ये बुडालेल्या मुलाचा मृतदेह मिळालाः अग्निशमक दलाच्या जवानांनी मृतदेह काढला बाहेर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

घोरपडी परिसरात कॅनोलमध्ये बुडालेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह अग्निशमक दलाच्या जवानांनी हडपसर परिसरातील शिंदे वस्ती कॅनोलमधून बाहेर काढला. ही घटना २४ मार्चला होळीच्या दिवशी बी टी कवडे रोड येथील कॅनोलमध्ये घडली होती. पारस सचिन प्रसन्ना (वय १४, रा. घोरपडी, पुणे) असे बुडालेल्याचे नाव आहे.

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस हा २४ मार्चला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील कॅनोलमध्ये बुडाल्याची वर्दी दलाला मिळाली होती. त्यानुसार दलाने मुलाला वाचविण्यासाठी शोधमोहिम सुरू केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याला वाचविण्यात अग्निशमक दलाला यश आले नव्हते. सोमवारी दुपारच्या सुमारास पारसचा मृतदेह अग्निशमन दल जवानांनी हडपसर, शिंदे वस्ती कॅनोलमधून बाहेर काढला.

सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

सासरच्या शाररिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिलेनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार वाघोली येथील ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटीत घडला. याप्रकरणी पतीला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संजय सखाहरी शिंदे (रा. ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटी, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर इंदुमती शिंदे व प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) या दोघींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सासरच्या जाचाला कंटाळून प्रिती संजय शिंदे यांनी फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत प्रिती यांचे वडील मोहन विष्णु मते (47, रा. आडगाव, नाशिक) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments