Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपार्सलमध्ये ड्रग्स असल्याचा केला बनावः ज्येष्ठ महिलेची 2 कोटींची ऑनलाइन फसवणूक

पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचा केला बनावः ज्येष्ठ महिलेची 2 कोटींची ऑनलाइन फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पार्सल मध्ये ड्रग असल्याचे सांगत ज्येष्ठ महिलेची दोन कोटींची ऑनलाइन फसवणूक

एका जेष्ठ नागरिक महिलेस तुमच्या नावाने मुंबई येथून पाठवलेले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करून आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हणत संबधित ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत 69 वर्षीय महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २६ एप्रिल ते ६ मे या कालावधीत घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर फेडेक्स कुरिअर ऑफिसमधून आकाशकुमार बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेले पार्सल हे कस्टममध्ये अडकले आहे. पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याने तुमच्या नावे मुंबईच्या एनसीबी डिपार्टमेंटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर एक अप्लिकेशन डाउनलोड करा असे सांगितले. त्यानंतर खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. तसेच बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या खात्यातील सगळे पैसे दिलेल्या बँक खात्यात पाठवा असे सांगितले. महिलेने सायबर चोरट्यांच्या सांगण्यावरून तब्बल २ कोटी ८० हजार रुपये सायबर चोरट्यांच्या बँक खात्यावर पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारक, मुंबई एनसीबी डिपार्टमेंटचे धारक वापर करते व वेगवेगळ्या बँक खात्यांचे धारक आणि वापरकर्ते यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे- पाटील पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments