Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्याः

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्याः

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पतीचे बाहेरच्या महिलांशी असणारे अनैतिक संबंध यामुळे पती- पत्नीत वाद होऊन, पती सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मोनिका मधुकर ओव्हाळ (वय 38) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय 45, राहणार, येरवडा, पुणे) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयताचा भाऊ प्रशांत सुरेश चाबुकस्वार (वय -31, रा. येरवडा, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार प्रशांत चाबुकस्वार यांची बहीण मोनिका आणि मधुकर ओव्हाळ यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर मोनिका या सासरी राहत असताना, त्यांच्या पतीचे बाहेरील महिलांशी अनैतिक संबंध होते या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन, पती सतत त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले आहे. याप्रकरणी पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस अहिरे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments