Monday, May 6, 2024
Homeक्राईम न्यूजकंपनीत महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी: औद्योगिक परिसरात सुरक्षा रक्षकासह कामगाराला धमकावून कॉपर...

कंपनीत महिनाभरात दुसऱ्यांदा चोरी: औद्योगिक परिसरात सुरक्षा रक्षकासह कामगाराला धमकावून कॉपर पट्या चोरीला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ट्रान्सफॉर्मन्स आणि त्यातील वायर तयार करणाऱ्या कंपनीत महिनाभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकासह कामगाराला धमकावून चोरटयांनी १४ किलो वजनाच्या कॉपर दोन पट्या चोरून नेल्या. याप्रकरणी नारायण लक्ष्मण ढगे (वय-२९, रा. सातदेवी मंदिराजवळ, कदमवस्ती, हवेली) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ५ ते ६ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हारको ट्रान्सफॉर्मन्स ही कंपनी रामटेकडी येथील इंडस्ट्रियल एरिया मध्ये आहे. कंपनीत ट्रान्सफॉर्मन्स आणि त्यातील वायर तयार करण्याचे काम चालत. चोरटयांनी सुरक्षारक्षक सुंदरलाल गुप्ता आणि कामगार नितीन कोंडीबा शेडगे यांना दोरीने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच चाकूचा धाक दाखवून आरडा ओरड केली तर मारण्याची धमकी दिली. यानंतर चोरटयांनी खिडकीचे ग्रील कटरच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला.

अवैधपणे कंपनीत प्रवेश केला तर सायरन आणि कंपनीच्या मालकाचा मोबाईल वाजतो. सायरन वाजल्याने कंपनीतील इतर कामगार हे जागे झाले. याचबरोबर कंपनीच्या मालकाने पोलिसांना फोन केल्याने पोलीस घटनास्थळी आले. पोलीस आल्याचे पाहून चोरटे पसार झाले. यावेळी चोरटयांनी १२ हजार ३९० रुपयांचा १४ किलो कॉपर पट्ट्या चोरून नेला. यादरम्यान महिनाभरापूर्वी चोरटयांनी या कंपनीतून साडे तीन लाखांचा कॉपर पट्या चोरून नेल्या होत्या. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस सोनावणे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments