Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजPM मोदींनी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाः माजी न्यायमूर्ती बी. जी....

PM मोदींनी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाः माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची मागणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गेल्या दहा वर्षात देशाची सत्ता चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी सरकार जाणार, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

कोळसे पाटील म्हणाले, संविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालय, संसद नंतर आहे. निवडणुक आयोग, न्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रीया बदलली. मोदी शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले. निवडणुक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सितारामन् यांचे पती म्हणत आहेत. मुलभुत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वतःहून अॅक्शन घेते. मात्र, देशात मुलभुत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे. देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या वाटेने चालत असून त्यांना देशाची चिंता आहे.

म्हणून पानसरे यांची हत्या झाली

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मी, एम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात “हु इज करकरे” या आंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नये, म्हणून करण्यात आली. त्यानंतर त्याला “शिवाजी कोण होता?” या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडवण्यात आली. मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होती, ते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्य प्रकारे काम केले नाही, असेही कोळसे पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments