Wednesday, May 1, 2024
Homeक्राईम न्यूज45 लाखांचा हवाला प्रकरणः पुणे पोलिस दलातील तीन कर्मचारी बडतर्फ; आयुक्त प्रवीणकुमार...

45 लाखांचा हवाला प्रकरणः पुणे पोलिस दलातील तीन कर्मचारी बडतर्फ; आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई– नाशिक महामार्गावर भिवंडी जवळ दिवे गावात एक कार 8 मार्च 2022 रोजी अडवून सदर कारचालकास तीन जणांनी पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधीत गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये घेऊन सदर कर्मचारी पसार झाल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणाचे चौकशीत पोलिस शिपाई गणेश मारुती कांबळे, दिलीप मारुती पिलाणे व गणेश बाळासाहेब शिंदे हे तिघे दोषी आढळल्याने त्यांच्यावर अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी पोलिस दलाच्या सेवेतून बडतर्फची कारवाई केली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश कांबळे, दिलीप पिलाणे व गणेश शिंदे या तीघांवर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर तिघांना पोलिस पदावरुन निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरु असताना, त्यात संबधित तिघे हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर बडतर्फ कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. पुण्यतील दत्तवाडी पोलिस ठाण्यात ते नेमणुकीस असताना, 8 मार्च २०२२ रोजी ते साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दिलीप पिलाणे याच्या बहिणीचा घरी धार्मिक कार्यक्रम असल्याचे कारण सांगून पुण्यातून दिवे येथे ते बाबुभाई सोळंकी यांच्यासह गेले होते. प्रवासा दरम्यान बाबुबाई सोळंकी यांना त्यांचे भावाचा फोन आला होता.

त्याद्वारे गणेश कांबळे याला समजले क, बाबुभाई सोळंकी यांच्याकडून हवालाचे पैसे हे औरंगाबादहून नाशिक मार्ग ठाणे येथे जाणार आहे.ड त्यानुसार, त्याने दिलीप पिलाणे व गणेश शिंदे यांच्यासोबत संगनमत करुन भिवंडी जवळील दिवे गावात रामलाल परमार याची हवालाचे पैसे घेऊन जाणारी गाडी अडवली. पोलिस असल्याचे सांगून गाडीची झडती घेण्याचे नावाखाली त्यांनी कारवाई करण्याची धमकी देत गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन तेथून पसार झाले. त्यानंतर याबाबत नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सुट्टीच्या दिवशी केला गंभीर गुन्हा

विभागीय चौकशीत गणेश शिंदे याने प्रशिक्षिण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही त्यामुळे साप्ताहिक सुट्टी घेतो असे खोटे कारण सांगून सुट्टीत घेत दीवे येथे जाऊन हा गुन्हा साथीदारांचे मदतीने केला. गणेश कांबळे याने तो आजारी नसताना देखील तो आजारी असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकांची दिशाभूल करुन सुट्टीचा पास मिळवला. तर दिलीप पिलाणे याने पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जात हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकारामुळे समजात पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकरणात आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी असल्याची पोलिस दलात चर्चा असून त्यांचेवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments