Saturday, May 18, 2024
Homeक्राईम न्यूजसुप्रिया सुळेंचा विरोधकांना इशाराः म्हणाल्या, निवडणुकीत लक्ष्मीदर्शनचे पुरावे मिळाल्यास रितसर आयोगाकडे तक्रार...

सुप्रिया सुळेंचा विरोधकांना इशाराः म्हणाल्या, निवडणुकीत लक्ष्मीदर्शनचे पुरावे मिळाल्यास रितसर आयोगाकडे तक्रार दाखल करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

निवडणुकीत लक्ष्मी दर्शनचे काही प्रकार घडत असल्याचे गोष्टी माझ्या कानावर येत अाहे. मला काही मुली सांगत होत्या की, असा एक घटक अाहे ज्यांना काही अशा हालचाली कानावर येतात. त्या महिलांना या गोष्टी अावडली नाही त्याबाबत अधिक माहिती अाम्ही घेत अाहे. याबाबत पुरावा मिळाल्यास अाम्ही निवडणुक अायोगाकडे तक्रार दाखल करणार अाहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना बारामती येथे व्यक्त केले.

पवार कुटुंबात मी लहानाचा मोठा झाला असून निवडून कसे यायचे मला माहिती आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अजित पवार यांचा स्वभाव माहिती असून ते कसे बोलतात माहिती आहे. शिवसेना नेते भरत गोगावले यांचे मुलाकडून हल्लयाचे प्रकार होतात याबाबत त्या म्हणाल्या, वारंवार निवडणुकीत धमक्याची भाषा होत आहे ही बाब चिंताजनक अहे. लोकशाहीसाठी ही बाब घातक असून पुन्हा अापण दडपशाहीकडे वाटचाल करत अाहे असे वाटू लागले आहे.

महाड येथे दुघर्टना झालेले चॉपर मधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अज सकाळी सांगलीतून पुण्यात प्रचारासाठी अाले. तेच चॉपर पुढे महाड येथे सुषमा अंधारे यांचेसाठी गेले होते. सुदैवाने या अपघातात पायलट किंवा सुषमा अंधारे यांना काही दुखापत झाली नाही. हेलिकॉप्टर मधील सुरक्षितता बाबत बारकाईने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे अाहे.

रायबरेलीतून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याबाबत अाम्हाला अधनंद अाहे. लोकशाहीत विरोधकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार अाहे असे सुळे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, सर्व विरोधकांचे भाषणात शरद पवारांवर टिका करणे केंद्रबिंदू असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख नेते अाहे. सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला अापले मत मांडण्याचा अधिकार अाहे. शरद पवार अाणि यशवंतराव चव्हाण यांच्यात कोणते नाते नव्हते परंतु चव्हाण यांनी त्यांना अापला मानस पुत्र मानला. विचार हा महत्वपूर्ण असतो अाणि तो सशक्त व्यक्तीच पुढे नेऊ शकतो. अशावेळी शरद पवार हेच त्यांचा विचार पुढे नेत आहे. बारामतीत प्रचाराची सांगता सभा अनेक वर्ष अाम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वात ज्या जागी घेत होतो त्याच जागी अजित पवार यांनी त्यांची सांगता सभा घेतली आहे. अनेक गोष्टी त्यांनी काढून घेतल्या त्याप्रमाणे ही देखील गोष्ट केलेली अाहे. त्यामुळे अाता अाम्ही प्रचार सांगता सभासाठी नवीन जागा पाहू.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments