Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजवाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन, कोंडीची समस्या सुटण्यास होणार...

वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन, कोंडीची समस्या सुटण्यास होणार मदत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो मार्गांचा विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था गतिमान होऊन, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल”, असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, सतीश मस्के, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मंगेश गोळे, अशोक कांबळे, शंकर संगम, रेखा टिंगरे, शशिकांत टिंगरे, ऐश्वर्या जाधव आदी यात सहभागी झाले होते.

मोहोळ म्हणाले, “शहरासाठी कालबद्ध पद्धतीने मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज होती आणि मेट्रोच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करीत आहोत. ही व्यवस्था आणखी व्यापक आणि भक्कम करण्यासाठी मेट्रोचा विस्तार करणे आवश्यक आहे. नवीन मार्गांमध्ये स्वारगेट ते कात्रज ५.४ किमी, पिंपरी ते निगडी ४.४ किमी, वनाज ते चांदणी चौक १.५ किमी, रामवाडी ते वाघोली १२ किमी, हडपसर ते खराडी ५ किमी, स्वारगेट ते हडपसर ७ किमी, स्वारगेट ते खडकवासला १३ किमी आणि एसएनडीटी ते वारजे ८ किमी या मार्गांचा समावेश आहे.”

हडपसर ते खराडी ५ किमी, स्वारगेट ते हडपसर ७ किमी, स्वारगेट ते खडकवासला १३ किमी आणि एसएनडीटी ते वारजे ८ किमी या मार्गांचा समावेश आहे.”

एक दशकाहून अधिक काळ पुणे मेट्रो प्रलंबित होती. भाजप सत्तेत आल्यानंतर स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments