Monday, May 13, 2024
Homeकात्रजवसंत मोरे लोकसभेची निवडणूक अपक्ष लढणार

वसंत मोरे लोकसभेची निवडणूक अपक्ष लढणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कात्रज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरु होती. अशातच त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

महायुतीकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना तर महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटी चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

मोरे म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच मी पक्षासोबत फारकत घेतली आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच ! निवडणूक न लढविल्यास ज्या लोकांनी माझ्यासाठी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यांचा हा अपमान असेल.

पुणे शहराचा विकास आणि कात्रज पॅटर्न शहरात राबविणे हेच माझे ध्येय असणार आहे. मी १५ वर्षे नगरसेवक असताना शहराला दाखविलेला विकास महत्वाचा आहे. कोरोना काळात मी केलेले काम पाहून लोक मला मतदान करतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार असेल. मोहोळ, धंगेकर आणि मोरे यांची लढत झाल्यास पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमनेसामने पाहायला मिळणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments