Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजरक्त तपासणी नमुन्यांच्या ट्युब घाटात टाकणाऱ्या कंपनीला एक लाखाचा दंड

रक्त तपासणी नमुन्यांच्या ट्युब घाटात टाकणाऱ्या कंपनीला एक लाखाचा दंड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्युब जुन्या कात्रज घाटात टाकून देणाऱ्या एन.एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक कंपनीवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. संबंधित कंपनीवर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करीत, संबंधित जैव वैद्यकीय कचरा तत्काळ उचलण्यास भाग पाडण्यात आले.

कात्रज येथील जुन्या घाटात रक्त तपासणीच्या ट्युब भरलेली पोती उघड्यावर टाकून देण्यात होती. हा प्रकार पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांना माहीत पडला. त्यानंतर या प्रकाराबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची गांभीर्याने दखल घेत घनकचरा विभागाचे प्रमुक संदीप कदम यांनी संबंधित कंपनीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रक्त तपासणी ट्युबवरील माहितीच्या आधारे कंपनीचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये धनकवडी येथील के. के. मार्केट परिसरातील एन.एम. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक कंपनीने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महापालिकेने संबंधित कंपनीवर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली. भविष्यात सार्वजनिक ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा टाकू नये, अशी सक्त ताकीद संबंधित कंपनीला देण्यात आली. त्यानंतर संबंधित कंपनीलाच त्यांनी टाकलेला जैव वैद्यकीय कचरा उचलण्यास सांगण्यात आले.

“जैव वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे हा गंभीर प्रकार आहे. संबंधित कंपनीला एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोणी या स्वरूपाचा प्रकार केल्यास त्यांच्यावरही दंडाची कडक कारवाई केली जाईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments