Friday, May 3, 2024
Homeक्राईम न्यूजयेरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालकाचा मृत्यू

येरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालकाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : येरवडा परिसरात गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालक विकी राजू चंडालिया (वय ३०, रा. जय जवान नगर, येरवडा) याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी विकी चंडालियावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली होती.

अग्रसेन हायस्कूलसमोरील व्ही. आर. ४ यू हॉटेलमध्ये मध्यरात्री सराईत गुन्हेगारांनी विकीकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी विकीला मारहाण केली. त्यानंतर आकाश चंडालियाने पिस्तुलातून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. विकीच्या पोटात गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, अमन सतीश चंडालिया, अभिषेक श्याम चंडालिया (सर्वजण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत प्रकाश कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश संतोष जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या घटनेत आरोपी आकाश चंडालिया हाही जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकाश याच्याविरुध्द यापूर्वी लोणावळा पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर, अक्षय चंडालिया आणि सुशांत कांबळे याच्याविरुध्द यापूर्वी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments