Saturday, May 4, 2024
Homeक्राईम न्यूजमहामार्गावर झाला दारुचा टॅन्कर पलटी, वाहतुकीची मोठी कोंडी

महामार्गावर झाला दारुचा टॅन्कर पलटी, वाहतुकीची मोठी कोंडी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे सातारा महामार्गावर शिवरे ता.भोर गावच्या हद्दीत अल्कोहल वाहतुक करणारा टॅन्कर पलटी झाला असुन रस्त्यामध्येच टॅन्कर अडवा झाल्या मोठी वाहतुक कोंडी झाली आहे, महामार्ग वाहतुक पोलिस व राजगड पोलिस क्रेनच्या सहाय्याने टॅन्कर बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालु असुन त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतुक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे.

आज ता.23 रोजी सकाळी सातारा बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारा टॅन्कर क्र. एम एच 48 बी एम 4132 हा उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी सेवा रस्त्यावर वळत असतानाच पलटी झाला अरुंद सेवा रस्त्यावर टॅन्कर पलटी झाल्याने सर्वच वाहतुक थांबली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी कार्यवाही चालु केली आहे

या अपघातामुळे महामार्गवरील वाहतुक पुर्ण ठप्प झाली असुन वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महामार्ग पोलिस व राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी असुन चार क्रेनच्या सहाय्याने टॅन्कर सरळ करण्याचे काम चालु आहे.

टॅन्कर मध्ये अल्कोहोल असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी देखिल या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहीती महामार्ग वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अस्लम खातिब यांनी दिली.

वाहतुक कोंडीने सकाळ सकाळ पुणे शहराकडे जाणारया नागरीकांची मोठी अडचण झाली असुन वाहनांच्या रांगा वरवे गावा पर्यंत पोहचल्या आहेत टॅन्कर अवजड असल्याने दुर करण्यासाठी वेळ लागत असुन पर्यायी रस्ता करता येतो आहे काय यासाठी देखिल वाहतुक पोलिस प्रयत्न करत असल्याचे सागण्यात आले आहे.

सोबत फोटो– शिवरे ता. भोर गावच्या हद्दीत महामार्गावर टॅन्कर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असुन क्रेन च्या सहाय्याने टॅन्कर बाजुला काढण्याचे काम चालु आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments