Sunday, May 5, 2024
Homeक्राईम न्यूजबारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड ! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत...

बारामती येथे जुन्या वादातून हत्याकांड ! कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याचा खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती येथील उंडवडी सुपे येथे बारामती बसमधून आलेल्या एका तरूणावर चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. महापुरुषाच्या जंयतीवरुन तसेच जुन्या वाडातून ही हत्या करण्यात आल्याचे तपसात उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात अलायी आहे.

विनोद भोसले (करखेल, ता. बारामती) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्या खून प्रकरणी आरोपी यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा बारामती येथे कॉम्पुटर इंजिनिरींगचे शिक्षण घेत होता. तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता एसटी बसने उंडवडीच्या बसस्थानकावर उतरला. यावेळी विनोद वर कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चौघांनी कोयता व कुऱ्हाडीने हल्ला केला. विनोदवर चौघांनी अनामुषपणे वर केले. यात विनोद हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला स्थानिकांनी दवाखान्यात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

जुन्या वादातून केला खून

पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी केल्यावर धक्कादायक कारण त्यांनी संगितले. गावात शिवजयंतीच्या वेळी झालेल्या वादातून तसेच दुचाकीवरुन जाताना कट मारल्याचा रागातून त्यांनी विनोदचा खून केल्याचे संगितले. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments