Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजपुणे जिल्हा बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखलः पैसे वाटण्यासाठी बँक सुरू ठेवली, रोहित...

पुणे जिल्हा बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखलः पैसे वाटण्यासाठी बँक सुरू ठेवली, रोहित पवारांचा आरोप; निवडणूक आयोगाने घेतली दखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेच्या बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरु ठेवण्यात आली असल्याचा आरोप बँकेवर करण्यात आला होता. दरम्यान, पीडीसीसी बँकेविषयी आमदार रोहित पवार यांनी तक्रार केली होती. रोहित पवारांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित पवारांची तक्रार काय?

पीडीसीसी बँक मध्यरात्रीपर्यंत चालू होती. अशी तक्रार रोहित पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अधिकाऱ्यांनी संबंधित बँक मॅनेजरशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मॅनेजरकडून सहकार्य करण्यात आले नाही. सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्या फुटेजमधून 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते. यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या कारवाईबद्दल रोहित पवार यांनी आभार मानले आहे.

काका पुतण्यांमधील संघर्ष वाढला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलाय. त्यातच आता रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधील संघर्षही वाढू लागला आहे. मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले. तर अजित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याला काही उद्योग नाही. माझ्याबद्दल वेडंवाकड बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणे. हेच त्याच काम असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला होता.

भोरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप

व्हाय सेक्युरिटी वाल्या गाड्या आहेत, पार्थ पवार सोडून सर्वत्र फिरताना दिसत आहेत. ते का फिरत आहेत? त्यामध्ये काय असते हे पाहण्याची गरज आहे. भोरमध्ये मावळच्या आमदारांचे नातेवाईक किंवा बंधू पैस वाटत होते. तेव्हा तिथे पकडलं, तिथे पोलीस उभे होते. पोलीसांनी काही केलं नाही. गाडी मात्र फोडली. पैसे आता पोलिसांनी नेले का कोणी नेले हे पाहावे लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

अजित पवारांचे प्रत्युत्तर

आता ही माझी गाडी आहे. गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कोणीतरी तिथे 500 च्या दोन-चार नोटा टाकल्या आणि शूटींग घेतलं, तर तुम्ही म्हणणार अजित पवारांच्या गाडीत नोटा सापडल्या? भोरमध्ये गाडीचंही उदाहरण दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे. पोलीस यंत्रणा आहे. त्यांनी याबाबतची चौकशी करावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments