Tuesday, May 21, 2024
Homeक्राईम न्यूजपताका लावण्यावरून पुण्यात दोन गटांत वादः 50 ते 60 जणांचा जमाव आला...

पताका लावण्यावरून पुण्यात दोन गटांत वादः 50 ते 60 जणांचा जमाव आला समोरासमोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पर्वती परिसरात पताका लावण्यावरून लहान मुलांमध्ये वाद निर्माण झाल्याचा प्रकार रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला. त्यानंतर पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल झाल्याने रात्री साडेबारा वाजता दोन गटांतील प्रत्येकी ५० ते ६० जणांचा गट समोरासमोर आकल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर सदर भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, पर्वती परिसरात नुरानी मशीद परिसरात काही लहान मुले पताका लावत होते. त्यावेळी एका जागी झेंडा काढल्याचा काही मुलांचा समज झाला व त्यातून वाद निर्माण झाला. याबाबत पर्वती पोलिस ठाण्यात एनसी दाखल झाली होती. त्यावरुन दोन गटात तणाव निर्माण झाल्याने दोन बाजूचे गट समोरासमोर अाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. याबाबत कोणी अफवा पसरवली त्यांचा शोध घेण्यात येत अाहे. दरम्यान, गेल्या महिन्यातच एका धार्मिकस्थळावरून दोन गटांत प्रचंड वाद झाला होता. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्या प्रकरणाचाही तपास अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments