Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजकायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च

कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडगाव : सिंहगड रस्त्यावरील हवेली पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत गुरुवारी (ता. २९) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी रूट मार्च काढण्यात आला.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला डोणजे व खानापूर आदी भागातून हा रूट मार्च काढण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.

यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) चे ४५ जवान यांच्यासह तसेच हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणचे १० जवान पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, दिलीप शिंदे तसेच पोलीस हवालदार संतोष तोडकर, पोलीस नाईक दीपक गायकवाड, संतोष भापकर, चंद्रकांत शिंदे यांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments