Monday, April 29, 2024
Homeक्राईम न्यूजकट्टर कमळभक्तांना घड्याळाकडे वळवण्याची दादा समर्थकांना चिंताः बारामतीसह इतर जागांवर 7 मे...

कट्टर कमळभक्तांना घड्याळाकडे वळवण्याची दादा समर्थकांना चिंताः बारामतीसह इतर जागांवर 7 मे रोजी पहिल्या टप्प्यात मतदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गेल्या वर्षी २ जुलै रोजी अजित पवार आणि त्यांचे सहकारी महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी त्यांनी किमान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पूर्ण अभ्यास केला असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रभाव असलेल्या बारामतीसह इतर जागांवर ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यास जेमतेम ४१ दिवस शिल्लक असताना दादा समर्थक पदाधिकारी जागृत झाले आहेत. वर्षानुवर्षे भाजपसाठीच मतदान करणाऱ्यांना कट्टर कमळभक्तांना घड्याळाकडे कसे वळवायचे, याची चिंता त्यांना लागली आहे. भाजपच्या मतदारांचा १०० टक्के पाठिंबा अत्यावश्यक असल्याचा सूर त्यांनी लावला आहे.

सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवादी अजित पवार गट बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, रायगड, परभणी आणि नाशिक लढवणार आहे. त्या सात मतदारसंघाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शरद पवारांनी मतदारसंघनिहाय कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवल्याने आपल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे पारंपरिक विभाजन होणार असल्याने आपली टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपचे पाठबळ मिळणे अत्यावश्यक आहे. हा कट्टरभक्त मतदान घड्याळाकडे कितपत वळेल, या विषयी आमच्या मनात शंका आहे.

धनंजय मुंडेंवर जबाबदारी राज्याच्या पूर्ण प्रचार यंत्रणेची

दरम्यान, अजित पवार यांनी सांगितले की, पक्षाचे राज्य प्रचार प्रमुख कृषिमंत्री धनंजय मुंडे आहेत. स्टार प्रचारकांची दोन दिवसांपूर्वीच बैठक झाली. प्रत्येक मंत्र्यांवर एक लोकसभा, आमदारावर विधानसभेची जबाबदारी दिली आहे. आमचा उमेदवार मतदारसंघात नसेल तेथे मित्र पक्षांसोबत समन्वयाने प्रचार यंत्रणा राबवण्यास सांगितले आहे.

सुप्रियांना कार्याध्यक्ष करण्यास आव्हाडांनीच केला होता विरोध

अजित पवार म्हणाले की, महायुतीत लढत असल्याने आपल्याला भाजपचं पाठबळ मिळेलच. पण तुम्ही आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचववा. आपण पक्ष चोरलेला नाही. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यास जितेंद्र आव्हाडांनीच विरोध केला होता आणि आता ते दुतोंडी भूमिका घेत असल्याचे दाखवून द्या. बारामतीत उमेदवार बदलणार नाही.

सातारा भाजपकडेच राहणार, उदयनराजेंचे पोस्टर्स लागले

दरम्यान, साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसलेच भाजपकडून लढतील. बुधवारी त्याची घोषणा होईल, अशी माहिती माढा येथील भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, साताऱ्यात उदयनराजेंचे पोस्टर्स झळकले आहेत.

अजित पवारांचे कट्टर विरोधक शिवतारेंना शिंदेसेनेची नोटीस बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे शिंदेसेनेचे नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांना शिस्तपालन समितीने नोटीस बजावली आहे. पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्याकडून कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments