Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजहवेली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आता लवकरच बायोमेट्रिक मशीन बसणार

हवेली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आता लवकरच बायोमेट्रिक मशीन बसणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यउपकेंद्रामध्ये आता लवकरच बायोमेट्रिक मशिन बसविण्यात येणार आहे. तसेच याची कार्यवाही त्वरीत करुन केलेल्या कार्यवाहीबाबत लेखी माहिती पंचायत समिती कार्यालयास द्यावी. असे आदेश हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी नुकतेच परिपत्रकाद्वारे दिले आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे हवेली तालुकाध्यक्ष कैलास भोरडे यांनी हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे अर्जाद्वारे मागणी केली होती. या अर्जामध्ये म्हटले होते कि, हवेली तालुक्यातील प्राथमिक उपकेंद्रावर परिचारिका तसेच इतर कर्मचारी शासनाच्या कामाच्या वेळेनुसार अरोग्य उपकेंद्रावर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे याचा सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, अशा अनेक तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्व अरोग्य उपकेंद्रावर बायोमेट्रिक मशिन बसवावेत. अरोग्य उपकेंद्राच्या दर्शनी बाजूस, कामाचे वेळापत्रक व दिल्या जाणाऱ्या सेवा याचे फलक लावण्यात यावे. तसेच अधिकारी किंवा कार्यालयाचा टोल फ्री नंबर फलकावर दर्शनी बाजूस लावण्यात यावा. तसेच कारवाईचा अहवाल मिळावा, अशी मागणी केली होती.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीने केलेल्या मागणीची त्वरित दखल घेऊन हवेलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये हवेली तालुक्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामधील बायोमेट्रिक मशिन बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आता नागरिकांची कामे मार्गी लागणार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments