Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजसासवड नगरपरिषदेचे कर्मचारी पेन्शन व इतर मागण्यांसाठी बेमुदत संपावर

सासवड नगरपरिषदेचे कर्मचारी पेन्शन व इतर मागण्यांसाठी बेमुदत संपावर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवड : महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना, मुलभूत प्रश्न व इतर मागण्यासाठी न्याय मिळावा म्हणून नगरपरिषद संवर्ग अधिकारी, कर्मचारी संघटना यांनी २९ ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सासवड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आजपासून सहभाग नोंदवून त्याबाबतचे निवेदन सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना देण्यात आले आहे.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना, विकास कामे इत्यादीसह कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून कोव्हीड योध्याचे काम पार पाडले आहे. तथापी शासनाचे विविध विभाग नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी मानायला तयार नाहीत, नगरपरिषदेमध्ये २००५ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत पेन्शन योजना व २००५ नंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू झालेली राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ही राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लागू झालेली नाही.

त्यामुळे इतर शासकीय विभागाच्या कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजनेची मागणी करीत असताना नगरपरिषद संवर्ग अधिकारी, कर्मचारी संघटना “जुनी पेन्शन योजना लागू करून लवकरात लवकर न्याय द्या”, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. त्यामुळे २९ ऑगस्ट पासून सासवड नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments