इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूरः सरदवाडी (ता. शिरूर) येथे आज (ता.04) रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर शिरुरवरुन पुण्याला जाणाऱ्या एका फॉर्च्यूनर चारचाकी गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्ता सोडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराशेजारील गाळ्यात घुसली. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, रस्त्याच्या कडेच्या घरांना कायमच धोका असल्याचे अनेक नागरिकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
अपघातामध्ये सरदवाडी येथील उद्योजक आशिष सरोदे यांच्या घराशेजारील व्यावसायिक गळ्यामध्ये फॉर्च्यूनर गाडी घुसल्याने व्यावसायिक गाळ्याचे शटर आणि भिंत पडल्यामुळे सरोदे यांचे मोठे नुकसान झाले. अपघात झाल्यानंतर आशिष सरोदे यांनी मदतीसाठी व पुढील कारवाईसाठी 112 नंबरवर संपर्क करुन शिरुर पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
प्राथमिक माहितीनुसार फॉर्च्यूनर चारचाकी वाघोली (ता. हवेली) येथील असल्याचे समजले. शिरुर पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास करीत आहेत.