Friday, November 22, 2024
Homeक्राईम न्यूजसत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे, मात्र, काही जण ऐकत नाहीत; अजित पवारांचा...

सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे, मात्र, काही जण ऐकत नाहीत; अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : मावळ तालुक्यातील कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पणआणि विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. काळानुरुप वडीलधा-यांनी सत्तरच्या पुढे गेल्यानंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे. मात्र, काही जण ऐकत नाहीत. हट्टीपणा करतात. एवढा हट्टीपणा कशासाठी, दुस-याला जमणार नाही का? आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले काम करुन दाखविले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

मी नाना नवले यांनाही सांगत असतो. तुम्ही आता वयस्कर झालेले आहेत. कोणाकडे तरी जबाबदारी द्यावी लागेल. कधी देणार, आम्ही म्हातारे झाल्यावर जबाबदारी देणार का? प्रपंच करत असताना काळानुरुप वडीलधा-यांनी सत्तरच्या पुढे गेल्यानंतर मुलांकडे जबादारी दिली पाहिजे. मात्र, काही जण ऐकत नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, दुस-याला जमणार नाही का? आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले काम करुन दाखविले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो. मला कोणाचा अपमान करायचा नाही. त्यांनी कारखाना उभा केला. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर आहे. मात्र, काळानुरुप बदलले पाहिजे. तरुणांकडे जबाबदारी दिली पाहिजे, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता केली आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना ऊसाला २८५० रुपये दर देतो. तर, बारामतीमधील सोमेश्वर ३५७१ आणि माळेगाव कारखान्याने ३६७१ रुपये दर दिला आहे. अशा पद्धतीने संस्था चालवायच्या असतात, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच लाडकी बहिण योजनेतून राज्यातील अडीच लाख उत्पन्न असलेल्या सर्व समाजातील महिलांना ओवाळणी टाकली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत महिलांच्या खात्यावर येतील हा माझा वादा असल्याचेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments