Saturday, August 30, 2025
Homeक्राईम न्यूजसचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई; अर्जुनने गुपचूप उरकला साखरपुडा

सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई; अर्जुनने गुपचूप उरकला साखरपुडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई: भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी आता लगीन घाई सुरु झाली आहे. सचिनचा मुलगा, क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याने त्याची बालमैत्रीण सानिया चांडोक हिच्यासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे, लवकरच सानिया ही तेंडुलकर कुटुंबाची सून होणार आहे.

नेमकी कोण आहे सानिया चांडोक ?

सानिया चांडोकचे वडीलही सचिन तेंडुलकर यांचे जवळचे मित्र आहेत. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून घई कुटुंबाचे मुंबईत मोठे नाव आहे. सानिया स्वतः ‘Mr. Paws Pet Spa and Store LLP’ मध्ये संचालक आणि डेसिग्नेटेड पार्टनर म्हणून कार्यरत आहे. सानिया आणि अर्जुन हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. तर अर्जुन तेंडुलकरने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळला आहे. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

साखरपुडा अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता लवकरच अर्जुन आणि सानिया विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहते उत्सुक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments