Friday, August 1, 2025
Homeक्राईम न्यूजशिंदे गटाचे 'मिशन मुंबई' सुरू; उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी नवी रणनीती

शिंदे गटाचे ‘मिशन मुंबई’ सुरू; उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी नवी रणनीती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबईः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जोरदार तयारी करत आहे. गेल्या तीन वर्षांत भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि समाजवादी पक्षांतील तब्बल १२३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील राजकारणाला एक नवी दिशा मिळत आहे.

शिंदे गटाच्या दाव्यानुसार, प्रवेश केलेल्या १२३ माजी नगरसेवकांपैकी ७६ माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आहेत. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी आणखी नगरसेवक पक्षात सामील होतील, असा विश्वास शिंदे गटाने व्यक्त केला आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद फक्त ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता मुंबईवर लक्ष केंद्रित केले. बंडात अनेक आमदारांनी साथ दिल्यानंतर, शिंदे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती आखली. मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी शिंदे गट टप्प्याटप्प्याने विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. याचा उद्देश केवळ मुंबईत पकड मजबूत करत आहे. या प्रयत्नांना यश येत असून, विविध पक्षांतील नगरसेवक टप्प्याटप्प्याने शिंदे गटात सामील होत आहेत.

महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने शिंदे गटाने सर्व २२७ प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले. या सर्व घडामोडींमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments