इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे): शाळेतील दिवस हे खरंच कमालीचे दिवस असतात. अर्थात त्यावेळी अभ्यासाचं ओझं वाटतं खरं; पण मोठं झाल्यानंतर मात्र त्या दिवसांची खरी किंमत कळते. तेव्हाचे प्रत्येक क्षण, गंमती-जमती, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, मित्र-मैत्रिणींसोबतचा रूसवा-फुगवा, लुटुपुटूची भांडणं या गोष्टी मनातल्या कप्प्यात घर करून राहतात.
मग कधीतरी अचानक शाळेतला एखादा मित्र भेटला की, नकळतपणे बालपणीच्या त्या आठवणींमध्ये आपण हरवून जातो. असाच अनुभव शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे-वळती हायस्कूलच्या 2003-2004 मधील दहावीच्या बॅचमधील सवंगड्यांना आला. वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी तब्बल 20 वर्षांनी हायस्कूलमध्ये आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते.
शाळेच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे सगळे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहिले. सामुहिक राष्ट्रगीत झाल्यानंतर शाळेचे संस्थापक शिंदवणे गावचे माजी सरपंच कै जनार्दन बापु महाडिक यांचा पुतळा पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच वर्गातील माजी विद्यार्थी सोनाली महाडिक यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते त्यांना सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने श्रध्दांजली वाहिन्यात आली.
शाळेमध्ये नेहमी प्रमाणे वर्ग भरला, मुलांची हजेरी झाली. नंतर सगळ्या विद्यार्थीने प्रत्येकाची ओळख सांगुन आपला जीवन परिचय सांगितला. शिक्षक वर्गाने आपला परिचय करुन मुलांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. काही विद्यार्थी आपला जीवन परिचय सांगताना भावनिक झाले. विषेश म्हणजे भरपूर विद्यार्थी चांगल्या नोकरीला आहेत. भरूपुर विद्यार्थी उद्योजक आहेत, तर काही विद्यार्थी दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसाय व शेती करत आहेत. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन, रमेश विचारे, दादासाहेब लांडे, संजय कोपनर, कल्याणी भोसले उपस्थित होत्या. मुलांचे सात्वंन करता लांडे सर भावनिक झाले व विद्यार्थी वर्गाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन महेश महाडिक, संतोष महाडिक, गणेश महाडिक, नवनाथ महाडिक, सचिन कुंजीर यांनी केले. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मनिषा म्हस्के वडघुले, दत्तात्रय मानिक म्हस्के, स्वाती माने, छाया महाडिक, रुपाली महाडिक, राजश्री पवार मेमाणे, कैलास खेडेकर, स्वाती कुंजीर खेडेकर, सीमा हंबीर जवळकर, अनिकेत म्हस्के, अभिजित महाडिक, श्रीकांत खेडेकर, अरुण कामठे, सागर महाडिक, विशाल म्हस्के, सुरेखा माने शितोळे, आशा महाडिक शेळके, मंगल कोतवाल चौधरी, वृषाली महाडिक हरगुडे, राणी झरड ताकवणे, स्वाती गायकवाड, सारिका कंजीर, ज्योती म्हस्के काळभोर, अर्चना म्हस्के, ज्योती झरांडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्र संचालन निर्मला शेळके कुतवळ व शिंदवणे सोसायटीचे संचालक माजी विद्यार्थी सचिन महाडिक यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन मनोहर खेडेकर यांनी केले. माणिक देवकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.