इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः आज (१५ जून) रोजी शनिवार वाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीच्या वतीने ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात ३०० मिटर पर्यंतच्या बांधकामास परवानगीच्या जाचक नियमांच्या कायद्याच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
परिसरातील नागरिकांकडून हातात फलक घेऊन, भिक नको, हक्काचे घर हवे. जाचक कायदे रद्द करा. १०० मिटर पर्यंत बांधकामावरील बंदी ऊठवा अशा घोषणा देण्यात आल्या.
या वेळी समितीचे अध्यक्ष सुनील तांबट यांनी छत्रपती शिवाजीमहाराज व पेशवे यांच्या काळापासून येथे राहात असलेला मुळचा पुणेकर असलेला रहिवाशी चुकीच्या कायद्यामुळे आज विस्थापित होत आहे. इथली जागा मोडकळीस आली आहे. जाचक कायद्यामुळे वाड्याचे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. बाहेर जाऊन फ्लॅट घेणे परवडत नाही, अशा कात्रीत अडकला आहे असे म्हटले.
अशी हजारो कुटुंब भरडली जात आहेत. त्यांना सरकारने न्याय द्यावा असे आवाहन केले. यावेळी मयुरेश पवार, गणेश नलावडे, संजय फेंगडे, कुंदन तांबट, अनुपमा मुजूमदार, स्वप्नील थोरवे, अनिल खराडकर, मुकूंद चव्हाण, अनिल दिवानजी, सुरेश पिंपळे, संजय आगरकर, किरण शेटे, रजनीकांत वेरणेकर, सचिन धाडवे, उषाताई मोरे, विशाल मोरे व अनेक कार्यकर्ते हजर होते.