इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आतावडगाव उड्डाणपूल चौकातील सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जाणाऱ्या सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. या उड्डाणपुलावरून उतरणारी वाहने वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जातात. वडगाव चौकातील सिग्नलची वेळ पूर्वी ७० सेकंद होती. वेळ कमी मिळत असल्याने वाहनचालकांना चौक ओलांडणे शक्य होत नव्हते. त्यामुळे उड्डाणपुलावर कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर वडगाव उड्डाणपूल चौकातील सिग्नलच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वडगाव उड्डाणपूल चौकातून धायरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आता १०० सेकंद देण्यात आले आहेत.
दरम्यान सिग्नलच्या वेळेत वाढ करण्यात आल्याने या भागातील वाहतूक सुरळीत झाली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.