इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ ने पकडले आहे. त्यांच्याकडून 38 किलो गांजा जप्त करण्यात आला. सुमेर सादिक तांबोळी (वय-26), विकास बाळू बनसोडे (वय-34, दोघे रा. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात तांबोळी आणि बनसोडे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 38 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव यांनी केली.
पुणे शहरात अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 3 हजार 676 कोटी 14 लाख 90 हजार 470 रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत