Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर मधील "त्या" अपघातातील ट्रक चालकाला अटक

लोणी काळभोर मधील “त्या” अपघातातील ट्रक चालकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कैलास वडेवालेच्या समोर शनिवारी (ता.14) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील ट्रक चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.

सार्थक विकास बाहेती (वय 18, रा. सूर्या पार्क, गुजर वस्ती, कवडीपाट टोल नाक्याजवळ, कदमवाकवस्ती तालुका हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नजिर महंमद सय्यद (वय 40, रा.मळद ता दौंड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन दिलीप महाडीक (वय 18, रा. सूर्या पार्क, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी मोहन महाडिक व सार्थक बाहेती हे दोघेजन दुचाकीवरून लोणी स्टेशनकडे दुचाकीवरून चालले होते. सार्थक हा गाडी चालवत होता तर मोहन हा पाठीमागे बसला होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एचपी गेट समोर असलेल्या कैलास वडेवालेच्याजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात सार्थक बाहेती हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या अंगावरून ट्रक गेला. या अपघातात सार्थक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोहन महाडिक हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगाने गाडी चालवुन समोरील मोटार सायकलीला पाठीमागुन जबर ठोसर मारल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे या अपघातात मृत्यू झालेल्या सार्थक बाहेतीच्या मृत्युस ट्रक चालक कारणीभुत ठरला आहे. अशी फिर्याद मोहन महाडिक याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार लोणी काळभोर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281,125 (अ). 125 (ब), 106(1) व मोटार वाहन कायदा कलम 184,134 (1), 119/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी ट्रक चालक नजिर सय्यद याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments