Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजलग्नाच्या आमिषाने गाडीत घेऊन जात अल्पवयीन मुलीवर बलत्कार; परप्रांतीय युवकाचं कृत्य, शिरूर...

लग्नाच्या आमिषाने गाडीत घेऊन जात अल्पवयीन मुलीवर बलत्कार; परप्रांतीय युवकाचं कृत्य, शिरूर तालुक्यातील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीलालग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन मावळ तालुक्यातील टाकवे येथे घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाई मंडल (रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. टाकवे, ता. मावळ जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलीला सोनाई मंडल या आरोपीने तिच्या घराजवळुन लग्नाचे अमिष दाखवत त्याने आणलेल्या चारचाकी वाहनातुन तो राहत असलेल्या मावळ तालुक्यातील टाकवे या ठिकाणी घेवुन गेला. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास इतर लोक कामवर गेले असताना पिडीत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधुन लग्नाचे आमिष दाखवत “अभी आपण दोनो शादी करणेही वाले है तो क्या प्रॉब्लेम है” असे म्हणत फिर्यादीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल याच्या विरुध्द फिर्याद दिली असल्याने बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments