Tuesday, July 1, 2025
Homeक्राईम न्यूजराज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याने दिला इशारा

राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याने दिला इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यात पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. मात्र, जूनच्या सुरुवातीला पावसाने काहीसा ब्रेक घेतला. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी धो-धो पाऊस पडत आहे. पुण्यात देखील गेल्या २४ तासात मोठा पाऊस झाला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यासह, मुंबई-कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. तसेच रस्ते देखील पाण्याने भरलेले आहेत. अशातच प्रशासनाकडून नागरिकांना काळजीचे आवाहन करण्यात येत आहे.

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 2-3 अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments